मुंबई, दि. 28, जानेवारी - गोवा महामार्गावर वडखळनजीक खारपाले गावाजवळ डंपर - कारमध्ये झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला असून यात गाड़ीचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील मृतांची नावे अद्याप समजलेली नाहीत. मात्र सर्व मृत हे रायगडच्या रोहा आणि खांब परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात 4 जणांचा मृत्यू
Reviewed by Dainik Lokmanthan
on
18:00
Rating: 5