Breaking News

माधुरीच्या मराठी सिनेमाचं पोस्टर रिलीज!


मकर संक्रांतीनिमित्तानं अभिनेत्री माधुरी दीक्षितनं मराठीत ट्विट करून शुभेच्छा दिल्यात. त्याचसोबत तिच्या पहिल्या मराठी सिनेमाचं बकेटलिस्टचं पोस्टर तिनं शेअर केलंय. 'बकेट लिस्ट...माझी,तुमची... आपल्या सगळ्यांची तिळगूळ घ्या, गोड गोड बोला.' असं तिनं ट्विट केलंय.माधुरी दीक्षितनं आतापर्यंत जवळजवळ 75 सिनेमे केलेत. पण मराठी सिनेमा पहिलाच. याआधी तिला श्यामची आई सिनेमासाठीही विचारलं गेलं होतं. सध्या माधुरी शूटिंगमध्ये बिझी आहे. शूटिंगचा काही भाग अलिबागमध्येही शूट झालाय. मकर संक्रांतीनिमित्तानं माधुरीनं सिनेमाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आणलाय.