Breaking News

कन्या जन्मानंद सोहळा घेण्याचा ठराव महिला ग्रामसभेत पारित


पारनेर /प्रतिनिधी /- कन्या जन्मानंद सोहळा घेण्याचा ठराव महिला ग्रामसभेमध्ये ठरविण्यात आले. ग्रामसभेत आजपासून जे पालक दोन मूलींवर ऑपरेशन करतील त्यांना ग्रामपंचायत वनकुटे यांच्याकडून उत्तेजनार्थ ११,०००/- रुपयाचे बक्षीस देण्यात येईल. त्यांची फिक्स पावती सदर मुलींच्या नावे करण्यात येईल असा ठराव सर्वानुमते करण्यात आला आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात स्री जन्माचे स्वागत करण्याचा ठराव करण्यात आला. 
तालुक्यातील वनकुटे येथे गुरुवार,२५ जानेवारी सकाळी 10.00 वाजता महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली. महिला ग्रामसभा अध्यक्ष ताराबाई बबन मुसुळे होत्या. तर सरपंच अँड राहुल झावरे व उपसरपंच श्री बाळासाहेब गागरे व ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कुलकर्णी, गणपत काळनर, दिपक खामकर, बाबासाहेब पिंपळे, भीमराज गांगड, वर्ष बर्डे , सुमन बर्डे, इंदुबाई साळवे, सुनिता वाबळे, रंजनाबाई औटी, ताराबाई काळे व ग्रामसेवक थोरात बी.एम,दिपक गुंजाळ तसेच किरण लिंगायत, शारदा डहाळे, शोभा खामकर, नंदा कजबे, स्नेहा झावरे, लहानबाई खैरे, चहाबाई साळवे, सुमन गागरे, बबई औटी, संगीता गागरे, शोभा साळवे,व इतर उपस्थित होते. 

महिला ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. जन्माला आलेल्या मुलींचे स्वागत करून त्यांना भेटवस्तू देण्याचे ठरविण्यात आले तसेच वाढत्या मुलींच्या भ्रूण हत्येबाबत सरपंच अँड राहुल झावरे यांनी स्री भ्रूण हत्येबाबत सविस्तर माहिती दिली सरपंच अँड राहुल झावरे बोलताना म्हणाले की आईचे उदर हे तीर्थक्षेत्र असून त्या तीर्थक्षेत्राची स्मशानभूमी होऊ नये. अशी खंत व्यक्त केली.त्यावेळी बेटी बचावो,बेटी पढाओ,या शासकीय कार्यक्रमाबाबत माहिती दिलीव गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या व त्या सर्वांचे सरपंच/उपसरपंच,ग्रामसेवक यांनी आभार मानले.