योग्य साथ मिळाल्याने फुले दांपत्याचे कार्य अमर : डॉ. जाधव
सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव, व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. के. पी. काकडे हे होते. त्यांनी मुलींचा आत्मविश्वास वाढविणारे कर्तुत्व सावित्रीबाईचे असल्याने महिलांनी त्यांच्या समाज कार्याचा आदर्श ठेवून सामाजिक जाणीवेतून जगण्याचे आवाहन केले. पुढे डॉ प्रतिभा जाधव यांनी सांगितले की स्त्रियांनी पारंपारिक अडगळ दूर करून कर्तबगार महिला होण्यासाठी व पुरुषी –अहंकाराला आळा घालण्यासाठी सतत संघर्ष करून सामाजिक विकास करण्यामध्ये सक्रियता दाखवावी .असा मौलिक सल्ला दिला .या कार्यक्रमास प्रा.डॉ शीला गाढे , डॉ रंजना वर्दे , प्रा राजाराम कानडे ,डॉ योगीता भिलोरे ,प्रा सौ धनवटे, श्री निलेश मनोहर निकम इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख प्रा. शांतीलाल जावळे यांनी केले. मान्यवरांचे आभार कु अक्षदा जगताप हिने मानले. तर सूत्रसंचालन कु. निशा आहेर व कु. ललिता भोरकडे यांनी केले.