बघायला गेले मुलगी आणि लग्नच करून आले घरी !
नवरदेव मुलगा बेलपिंपळगाव या ठिकाणी होता त्याला फोन वरून सगळी माहिती दिली नवरदेव त्या लग्न मंडपात येण्यापूर्वी पाहुण्यांनी सगळी तयारी करून ठेवली होती ,आज काल मुलाचं असो वा मुलीच असो प्रत्येकाला वाटत आपल्या दारात लग्न मोठ्या थाटामाटात व्हावं पण आज काल असेही काही उच्च शिक्षित तरुण, तरुणी आहे की सगळ्या खर्चला फाटा देऊन सध्या पद्धतीने लग्न करतात लग्नात अनाठायी खर्च केला जातो. सत्कार समारंभ यावर मोठा खर्च होतो. मानपान या सगळ्या गोष्टीला फाटा देत अत्यंत साध्या पध्दतीने लग्न करून शिक्षित कुटुंबानं चांगला आदर्श समाजापुढे ठेवला.
चि. राहुल शिंदे (m.com)व चि. सौ. का. शितल झिरपे(msc) यांचा विवाह सोहळा साध्या पद्धतीने रात्री संपन्न झाला या वेळी उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिक, पाहुणे, मित्र मंडळ यांनी या नवं वधुवर यांचे अभिनंदन केले व समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला की, उच्च शिक्षणचा फायदा नोकरीत ,व्यवसाय, याच बरोबर आपल्या जीवनात देखील कसा फायदा होईल यावर लक्ष वेधले.