Breaking News

जयहिंदच्यावतीने आ. डॉ. तांबेंना 500 पुस्तके भेट


संगमनेर (प्रतिनिधी) - पुरोगामी विचारांचे पाईक असलेल्या आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या वाढदिवसानिमीत्त हार तुरे न आणता सामाजिक जाणीव ठेवून पुस्तक भेट देवून पुस्तक मैत्री दिन म्हणून सर्वांनी साजरा करावा असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जयहिंद युवा मंच्या वतीने 500 पुस्तके भेट देण्यात आले आहे.
निरोगी व निकोप समाज निर्मीतीचे कार्यकरणार्‍या जयहिंद युवा मंच या सामाजिक संघटनेने सातत्याने विविध उपक्रम राबविले आहे. अंध, अपंग, मुकबधीर, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही काम केले. नेता नव्हे मित्र अशी ओळख आपल्या कार्यकतृत्वातून यांनी निर्माण केली. म्हणून पुस्तकप्रेमी असलेले आ.डॉ. तांबे यांचा वाढदिवस पुस्तक मैत्रीदिन म्हणून साजरा करण्यात आला होता. हार,गुच्छ,शाल व फेटे यांचा काहीही उपयोग होत नाही.मात्र पुस्तकांचा सामाजिक उपक्रमांसाठी उपयोग होतो.शहरातील व तालुक्यातील ग्रंथालये,शाळा यांना ही पुस्तके भेट म्हणून देता येवू शकतील या उद्देशाने वाढदिवस पुस्तक मैत्रीदिन म्हणून साजरा करण्यात आला. जयहिंदचे प्रकल्प प्रमुख गणेश गुंजाळ, तुषार गायकर, मिलींद औटी यांच्या संकल्पनेतून व जयहिंदच्या माध्यमातून 500 पुस्तके भेट देण्यात आले.