Breaking News

शिक्षण देणारी शिक्षणाची पंढरी उभारणार : काळे


कोपरगाव ता. प्रतिनिधी :- माजी खा. स्व. शंकरराव काळे यांनी ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, यासाठी कर्मवीर एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून गौतम पब्लिक स्कुल सुरु केले. या एज्युकेशन सोसायटीचे वटवृक्षात रूपांतर होऊन ही संस्था आज कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी या नावाने ओळखली जाते. या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. संस्थेचे उच्च माध्यमिक विद्यालय, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट व विविधमाध्यमिक विद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी आपले शिक्षणाचे स्वप्न करीत आहेत. मात्र यावरच थांबणे संयुक्तिक नाही. भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून एकाचवेळी १५ हजार विद्यार्थी विविध प्रकारचे व्यावसायिक दर्जेदार शिक्षण घेऊ शकतील, अशी शिक्षण पंढरी उभारणार असल्याचा आपला मानस आहे, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, युवा नेते आशुतोष काळे केले. 
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये गौतम फेस्टिव्हलच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते.माजी खा. स्व. शंकरराव काळे यांनी रयत शिक्षण संस्थेचा कार्यभार साभाळत असतांना ग्रामीण भागात रयत शिक्षण संस्थेचे जाळे विणले. पण स्वत:च्या खासगी शैक्षणिक संस्था न काढता कर्मवीर भाऊराव पाटलांचा पवित्र ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरु ठेवला. शिक्षणाचा बाजार होऊ दिला नाही. स्व. साहेबांचा वसा माजी आ. अशोक काळे यांनी प्राणपणाने जोपासला. हाच वारसा मला यापुढे चालवायचा आहे. मीही स्व. साहेबांच्या विचारांच्या पावलावर पाऊल ठेवून शिक्षणाचे बाजारीकरण होऊ देणार नाही.- आशुतोष काळे, युवा नेते. 

ते म्हणाले की, आपला परिसर ग्रामीण भागातील असूनही उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजपर्यंत आपण करीत आलो आहोत. पुढील वर्षी सर्व सोयी सुविधांनीयुक्त अशा नव्या इमारतीमध्ये गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना शहरातील महाविद्यालयाचा अनुभव मिळणार आहे.

याप्रसंगी झी मराठी हास्यसम्राट उपविजेते प्रकाश भागवत यांची प्रमुख अतिथी होती. संस्थेचे उपाध्यक्ष छबूराव आव्हाड, सभापती अनुसया होन, कारभारी जाधव, कारभारी आगवन, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते, सुनील शिंदे, अरुण चंद्रे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, संस्थेचे विश्वस्त भास्करराव आवारे, सिकंदर पटेल, चंद्रकांत औताडे, पुंडलिक माळी, रोहिदास होन, रणजित जगताप, साहेबराव भोसले, चांद पठाण, राजेंद्र भाकरे, सुशिलामाई काळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ, बाबासाहेब बढे, आदी उपस्थित होते. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष भारती यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देशमुख व प्रा. अतुल नीळकंठ यांनी केले.