Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाला गती द्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीला निर्देश


छत्रपती शिवाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच अरबी समुद्रातील स्मारकासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया तत्काळ पूर्ण करुन प्रत्यक्ष काम सुरु होईल, याचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या स्मारकाच्या प्रगतीचा आढावा घेताना एका बैठकीत दिले.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संदर्भात वर्षा निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार विनायक मेटे, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, अतिरिक्त मुख्य सचिव डी. जे.जैन, अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव आशिष कुमार सिंग, सचिव अजित सगणे आदी वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील जगातील सर्वात उंच स्मारकाच्या प्रगतीचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीतून आढावा घेतला. यासाठी प्राधिकृत मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीला आता या कामातील सर्व प्रक्रिया पूर्ण करुन प्रत्यक्ष कामाला वेगाने सुरुवात करता येईल असे नियोजन करावे, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.