Breaking News

भाकपची तालुका परिषद उत्साहात


शेवगांव / प्रतिनिधी । 25 ःभारतीय कम्युनिस्ट पक्षाची शेवगांव तालुका परिषद उत्साहात सामनगाव येथे पार पडली. या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या परिषदेमध्ये तालुक्यातील पक्षाच्या सभासदात वाढ करने तसेच शेवगांव तालुक्यातील विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती विषयीचे ठराव या परिषदेसमोर मांडण्यात आले, तसेच प्रामुख्याने शेतकरी समस्या, जातीअंधपणा, सत्ताधारयांनी धर्म निरपेक्षतेला दिलेली तिलांजली, आर्थिक शोषण, केंद्र व राज्य सरकारचे धोरण याबाबत चर्चा झाली, शेतकरी, कामगारांच्या आंदोलनाबाबत लढा देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. तरुण पिढीला पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी ही परिषद कॉ. कष्णनाथ पवार, कॉ. शशिकांत कुलकर्णी, कॉ. अमोल खोसे यांच्या अध्यक्ष मंडळाखाली पार पडली, यावेळी प्राचार्य शिवाजीराव देवढे, कॉ. सुभाष लांडे, कॉ. संजय नांगरे, भगवान गायकवाड, अशोक नजन, शंकर देवढे, आत्माराम देवढे, कारभारी वीर, राम पोटफोडे, यौहान मगर, नंदु नजन, अशोक पंडित, शिवाजी वीर, शिवाजी भुसारी, महादेव आव्हाड, आसाराम उगले, नारायण उगले, मुरलीधर काळे, एकनाथ डोईफोडे, अण्णासाहेब भराट, एकनाथ राशीनकर, गहिनीनाथ आव्हाड, विष्णू डमाळ, नानासाहेब डमाळ, केशव कापरे, पंढरीनाथ साबळे, गहिनीनाथ टेकुळे, भानुदास गौळी आदींसह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते.