देवगडचा दुय्यम निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात
सिंधुदुर्गनगरी, दि. 12, जानेवारी - देवगड येथे असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात दुय्यम निबंधक वर्ग 3 या पदावर कार्यरत असलेल्या श्रीनाथ गोविंद हुल्याळकर (वय 48) याला लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. मागील आठवडाभरातील लाचलुचपत विभागाची देवगड मधील ही दुसरी कारवाई आहे.
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक शंकर चिंदरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे मित्राला त्यांच्या घराच्या वाढीव बांधकाम करण्याकरिता बॅकेतुन कर्ज घ्यायच होत. त्या कर्जाकरीता घराच मुल्याकन आवश्यक होते. या कामाकरीता त्यांनी तक्रारदाराला संमती पत्र दिले होते आणि त्या प्रमाणे तक्रारदाराने देवगडच्या दुय्यम निबंधक क ार्यालयात स्वत:च्या नावाने अर्ज केला होता. मुल्यांकन करुन देण्यासाठी हुल्याळकर यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु तडजोडीअंती 4 हजार रुपयांवर व्यवहार ठरला. त्यापैकी 1 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना पोलिस उपअधिक्षक शंकर चिंदरकर सिंधुदुर्ग युनिट व स्टाफ यांनी सापळा रचून त्याला रंगेहाथ पक डले. आठवडाभरातली लाचलुचपत विभागाची दुसरी यशस्वी धडक कारवाई आहे.
