Breaking News

पारनेर शहरात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे च्या जयंतीचा विसर


पारनेर/प्रतिनिधी /- शहरामध्ये दरवर्षी 23 जानेवारी या दिवशी आमदार कार्यालयात शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शहरात रुग्णांना फळे वाटप,रक्तदान शिबिर, वसतिगृहातील अनाथ विद्यर्थ्यांना मिठाई वाटप करुन साजरा केला जात होता. परंतु या वर्षी त्यात खंड पडल्याने शहरातील सामान्य शिवसैनिकानी आश्चर्य व्यक्त केले आहे.
पारनेर शहरात दरवर्षी 23 जानेवारी हा दिवस तमाम शिवसैनिकांचे आदरस्थान शिवसेनाप्रमुख यांचा जन्मोत्सव विविध सामाजीक उपक्रमांनी साजरा केला जात असे,परंतु मंगळवारी शहरातील नगरपंचायत कार्यालय ,आमदार कार्यालय ,शिवसेना पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य यांना जयंतीच विसरल्याने शहरातील शिवसेना पदाधिकारी युवा शहरप्रमुख निलेश खोडदे यांच्याशी संपर्क साधला असता,मला वेळ मिळाला नाही तसेच माझा मुलगा आजारी आहे. असे पोकळ उत्तर देउन जबाबदारी टाळली. तर पंचायत समिती सदस्य डॉ.श्रीकांत पठारे म्हणाले की, मला शहरातील कोणत्याही सेना पदाधिकारी यांचा फोन आला नाही. मला पेशंट असल्याने वेळ मिळाला नाही. तर नगरपंचायत मध्ये दुपारी नगरसेवक वायफळ गप्पा मारत बसले होते. परंतु त्यांनाही ज्यांच्या नावाचा पदावर येण्यासाठी वापर केला. त्यांचा विसर पडल्याचे चिञ दिसुन येत होते. शिवसेना पदाधिका-यांबद्दल शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे.