Breaking News

बाजार समितीसंबंधी राजकारण करू नका : बोरनारे


कोपरगाव / प्रतिनीधीतालुक्यातील शेतकरी बांधवासाठी कामधेनु असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून लासलगांव व विंचुरनुसार शेत मालाची खरेदी होत आहे. शेतकरी बांधवांना चांगला बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. परंतु याचेदेखील काही पुर्वग्रहदुषित मंडळी राजकारण करत आहेत. बाजार शेतकरी बांधवांचे संसार अवलंबून असलेल्या कृषी उत्पन्न बाजारसमितीसंबंधी राजकारण करू नका, असे आवाहन संचालक भरत बोरनारे यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. यात म्हटले आहे, बाजार समितीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मंजूर असलेली अनेक कामे प्रलंबित आहेत. कर्मचारीवर्गाच्या शिस्तीसंदर्भात वेळोवेळी सूचना करूनदेखील कोणतीच कार्यवाही नाही. व्यापारी, मापाडी व हमाल यांना विश्वासात घेणे तसेच वर्तमानपत्रात जाहिरात देण्यासंदर्भात सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेणे गरजेचे आहे. मात्र असे असताना माझ्यासह माझे सहकारी सुधाकर गाढवे आम्ही उपहारग्रुह व शेणखत तसेच शेतकरी व संस्था या दोघांच्याही हिताकरिता नेहमीच भांडत असतो. वारंवार सूचना करतो. परंतु काही मंडळी केवळ फक्त आणि फक्त राजकारण एवढेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन कामे करत आहे. हे येणाऱ्या काळात संस्थेच्या दृष्टीने घटक आहे, असे बोरनारे यांनी या पत्रकात शेवटी म्हटले आहे.