कृषी विभागाच्यावतीने 21 ते 25 फेब्रुवारीला जिल्हा कृषी महोत्सव
महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येईल तसेच कृषी साहित्य, उत्पादने यांच्या विक्रीसाठी दालने, कृषी सेवांशी संबंधित उत्पादक, वित्तीय संस्था, शेतकरी महिला गटांची खाद्य पदार्थांची दालने, कृषी माल प्रक्रिया उद्योजकांचाही यामध्ये सहभाग आहे. तसेच यासह सिंचन, कृषी तंत्रज्ञान, गृहोपयोगी वस्तु, धान्य, खाद्य पदार्थांची दालने असतील. रेशीम विकास विभाग, वनीकरण, पशुसंवर्धन, मत्स उद्योग कृषी विज्ञान केंद्र, नाबार्ड, फलोत्पादन, पणन मंडळ आदी विविध शासकिय यंत्रणांचे स्टॉल्स असतील.
यावेळी शेतकर्यांच्या समस्या व अडचणींवर परिसंवाद, व्याख्यानांच्या माध्यमातून विचारमंथन घडवून आणण्यात येणार असून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महोत्सवाचा उपयोग केला जाणार आहे.
