शहरातील स्वच्छ वार्डाला मिळणार 15 लाखांचे बक्षीस : महापौर
जळगाव, ]]सुंदर शहर, स्वच्छ शहर’ या ब्रिद वाक्यानुसार शहरातील स्वच्छ वार्ड संदर्भात स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत शहरातील स्वच्छ वार्ड स्पर्धा होणार असून पहिले बक्षीस 15 लाख, द्वितीय 10 लाख, तृतीय 5 लाख याप्रमाणे देण्यात येणार असल्याची माहिती महापौर ललित कोल्हे यांनी दिली.
स्पर्धेत विजयी झालेल्या वार्डातील संबंधित नगरसेवकाच्या प्रभागात विकासकामे करण्यासाठी वरील रक्कम प्रदान केली जाणार आहे. नगरसेवकांना प्रभागातील प्राथमिक सुविधांवर लक्ष देता यावे, त्यात नागरिकांचाही सहभाग वाढावा यासाठी स्वत:चा प्रभाग स्वच्छ व सुंदर रहावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत साधारण खालीलप्रमाणे निकष तपासले जातील, नागरिकांचे सहकार्याने अथवा श्रमदानाने स्वच्छता मोहीम, उद्यान, खुले भूखंड परिसरात राबवावी, ओला व सुका कचरा 100 टक्के वेगवेगळे करावा, प्लास्टीकमुक्त प्रभाग, कचराकुंडीमुक्त प्रभाग, उद्यानाची स्वच्छता व विकास, स्वच्छता व सुशोभिकरण, चौक सुशोभिकरण, कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रभागात नियोजन, रस्त्यावर वेस्ट मटेरियल नसावे, स्वच्छतेसाठी प्रभागात रॅली जनजागृती आदी उपक्रम राबविणे, लोकसहभागातून परिसरात किंवा उद्यानात कंपोस्ट निर्मिती करणे, शाळांमध्ये स्वच्छता समिती स्थापन करणे, नागरिकांना स्वच्छता प डाऊनलोड करण्याबाबत प्रोत्साहित करणे, नगरसेवकांनी प्रभागातील नागरिकांच्या सहभागाने वरील कामे करणे आवश्यक आहेत, असेही महापौरांनी सांगितले.