Breaking News

बिटकॉईन ट्रेडिंग प्रकरणी सुमारे ४-५ लाख व्यक्तींना नोटिसा

नवी दिल्ली : बिटकॉईन या व्हर्च्युअल चलनातील गुंतवणूक व त्याचा व्यापार या संबंधातील चौकशी आता आयकर विभागाने विस्तारीत केली असून या प्रकरणांमध्ये देशातील ४ ते ५ लाख उच्च मूल्यांकित व्यक्तींना नोटिसा धाडण्यासाठी तयारी केली आहे. या अनियंत्रित असणाऱ्या व्हर्च्युअल चलनाबाबत जे ट्रेडिंग करतात त्यांना या नोटिसा धाडण्यात येणार आहेत. 


या संबंधात कर अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात अशा प्रकारच्या नऊ एक्स्चेंजमध्ये तपासणी केली. यामध्ये सुमारे २० लाख एंट्री त्यांना या एक्स्चेंजमध्ये आढळून आल्या व सुमारे ४ ते ५ लाख व्यक्ती या अशा प्रकारच्या बिटकॉईनच्या ट्रेडिंगमध्ये गुंतलेल्या असल्याचे व गुंतवणुकीमध्ये संबंधित असल्याचे व कार्यान्वित राहिल्याचे आढळून आले. बंगळुरू येथील चौकशी पथकाने ही तपासणी केली, तसेच देशातील अन्य आठ ठिकाणीही पाहणी केली.