Breaking News

रोहयोच्या कामातील गैरव्यवहाराबद्दल ग्रामरोजगार सेवक निलंबित


हिंगोली जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामात बनावट नावे टाकून मजुरी घेतल्याबद्दल ग्रामरोजगार सेवकास निलंबित करण्यात आल्याचे रोजगार हमीमंत्री जयकुमार रावल यांनी सदस्य रामराव वडकुते यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विधानपरिषदेत सांगितले.
या रोजगार हमी घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली असता काही प्रकरणात नियमबाह्य मजुरी प्रदान केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार ग्रामरोजगार सेवक हे दोषी आढळून आले व त्यांच्याकडून अतिप्रदानाची 962 रु. इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. गरज वाटल्यास उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येईल. असे श्री.रावल यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित यांनी भाग घेतला.