Breaking News

देवनार सिंचन प्रकल्पाच्या आराखड्यास मान्यता - गिरीष महाजन


येवला तालुक्यातील देवनार सिंचन प्रकल्पाच्या सर्वसाधारण आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. असे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी सदस्य हेमंत टकले यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात विधानपरिषदेत सांगितले.
श्री.महाजन म्हणाले, या सिंचन प्रकल्पाच्या अंदाजपत्रकासाठी क्षेत्रीय स्तरावर आवश्यक प्राथमिक सर्वेक्षण व अन्वेषण पूर्ण झाले आहे. बुडित क्षेत्रातील वन जमीन संपादनासाठी आवश्यक संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात आली आहे.