Breaking News

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड नजीक वाहनातून मोठा शस्रसाठा जप्त

मनमाड, दि. 16, डिसेंबर - मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या टोल नाक्याजवळ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईकडे जाणार्‍या बोलेरो गाडीतुन मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. यात पोलिसांकडून 25 रायफल 17 रिव्हालवर 2 विदेशी पिस्तुल 4146 काडतुस केली जप्त केली असून 3 जणांना ताब्यात घेतले आहे.


वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून शस्रसाठा कुठून आणला आणि कुठे घेऊन जात होते याचा पोलीस तपास करीत आहेत.पोलिसांनी गाडीची कसून तपासणी केल्या नंतर 25 रायफल देखील सापडल्या असून आरोपी हे मुंबईचे असल्याचे समजते.


मालेगावच्या एका पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल टाकल्या नंतर त्याचे पैसे न देता रिव्हावलर दाखवून पळून गेले.
पंप चालकाने मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना घटनेची माहिती दिली, त्यांनी तातडीने चांदवड पोलिसांशी संपर्क करून नाकेबंदी करण्याचा आदेश दिला.त्यानुसार नाकेबंदी केल्यानंतर बोलेरोला टोल नाक्या जवळ अडविण्यात आले असता आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलीसही सावध असल्याने त्यांनी आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले. त्यानंतर वाहन पोलीस स्थानकात नेण्यात आले. वाहनांची कसून तपासणी केल्यानंतर 25 रायफल 17 रिव्हालवर 2 विदेशी पिस्तुल 4146 काडतुस जप्त केली आहे. पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहे.