Breaking News

पीग्मी एजंट डिगंबर केवडे अचानक बेपत्ता


जामखेड/प्रतिनिधी /- जामखेड येथील पीग्मी एजंट डीगांबर ज्ञानोबा केवडे( वय. ४९ रा. बेलेकर गल्ली. जामखेड) हे दि १४ डिसेंबर रोजी सायंकाळी बँकेचे कलेक्शनला जात आहे असे सांगून गेले. परंतु तीन दिवस झाले तरी ते घरी परतले नसल्याने ते हरवल्याची तक्रार नातेवाईकांनी जामखेड पोलिस स्टेशनला दाखल केली आहे. 
दिगांबर केवडे हे नेहमी प्रमाणे तीन दिवसान पुर्वी म्हणजे दि १४ डिसेंबर रोजी पतसंस्थेच्या कलेक्शन गोळा करण्यासाठी मोटारसायकलवर घराबाहेर पडले. सायंकाळी त्यांनी शहरातील कलेक्शन केल्या नंतर, शेवटी रात्री साडेदहा वाजता नगररोडवरील एका हॉटेल मधिल कलेक्शन केले. या नंतर तेथुन ते अचानक बेपत्ता झाले.या वेळी मोबाईल देखील त्यांचा लागत नव्हता. 

तेव्हापासून ते अद्याप घरीच आले नसल्याने याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे जामखेड मधून दहा ते बारा वर्षापूर्वी असेच बँकेचे कलेक्शन करणारा अशोक जाधव हा तरूण अचानक गायब झाला आहे. त्याची सी आय डी चौकशी सुरू आहे.त्याचा अद्याप ठावठिकाणा लागला नाही. डिगांबर केवडे कलेक्शन करत असताना तीन दिवसांपुर्वी नगर रोडवरहुन अचानक गायब झाले आहेत.या घटनेमुळे जामखेड शहरात खळबळ उडाली आहे. सदर व्यक्ती कोठे आढळून आल्यास जामखेड पोलिस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन जामखेड पोलिसांनी आवाहन केले आहे.