राणेंचे पुनर्वसन, खडसेंना विश्रांती : मुख्यमंत्र्यांचे संकेत
नागपूर : काँग्रेस सोडून स्वत:चा पक्ष काढणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकरिता दिलासा देणारी बातमी आहे. लवकरच राणे यांचे राजकीय पुनर्वसन होणार आहे. यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, मंगळवारी पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करताना तसे संकेत दिलेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, विधीमंडळाच्या वार्तांकनासाठी नागपुरात आलेल्या पत्रकारांची सुयोग येथे जाऊन भेट घेतली. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चे मुख्यमंत्र्यांनी लवकरच राणे यांचा मंत्रीमंडळात समावेश होण्याचे संकेत दिलेत. तर एकनाथ खडसे यांच्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी पुनर्वसन विस्थापितांचे होत असून खडसे हे प्रस्थापित नेते आहेत असे सांगितले. त्यामुळे स्वत:च्याच पक्षाविरुद्ध विधानसभेत आगपाखड करणा-या खडसेंना तसेच ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट झाले.