गैरव्यवहार सिध्द होऊनही कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके कारवाई कक्षेतून मोकळ्या कशा?
आमदारांचा सभागृहात सवाल ; लोकप्रतिनिधींची सुरक्षा ऐरणीवर तरीही साबां मंत्री ढिम्म.
नागपूर/विशेष प्रतिनिधी : मुंबई शहर इलाखा साबां विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे मनोरा आमदार निवासातील लोकप्रतिनिधींच्या जीवावर बेतण्याची नौबत ओढवली असतानाही शासन विशेषतः सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून हा गंभीर प्रकार बेदखल केला जात असल्याने उपराजधानीत सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तत्कालीन कार्यकारी प्रज्ञा वाळके यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यात साबां मंत्र्यांना एव्हढे स्वारस्य का असा सवाल सदस्यांमध्ये गुढ निर्माण करीत आहे. केवळ एखाद दुसरा अभियंता निलंबित करून हा भ्रष्टाचार थांबणार नाही तर भ्रष्टाचार करणार्या उच्चपदस्थ अभियंत्यांच्या मुसक्या आवळण्याचा सल्लाही विरोधी बाकावरून जळगावचे आमदार सतिश पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मं÷त्र्यांना दिला. आ. पाटील यांचा शहर इलाखा साबां विभागाच्या बहुचर्चित कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्यावर ठपका ठेवल्यानंतरही साबां मंत्री आणि प्रशासनाकडून दाखविली जात असलेल्या मेहेरबानीवर रोख होता. दरम्यान या प्रकरणावर आ. विरेंद्र जगताप यांच्या लक्षवेधीवर चर्चा अपेक्षित आहे.
गेल्या आठवड्यात आमदारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा गैरव्यवहार गुलाबी थंडीतही साबांतील भ्रष्ट प्रवृत्तींचा घाम काढण्यास कारणीभूत ठरल्यानंतर दुसर्या आठवड्याच्या दुसर्या दिवशी म्हणजे मंगळवारी देखील जळगांव जिल्ह्यातील एरंडोल पारोळा मतदार संघाचे आ. डॉ. सतिश आण्णा पाटील यांनी या मुद्याच्या अनुषंगाने साबांतील भ्रष्टाचारामुळे लोकप्रतिनिधींची सुरक्षा ऐरणीवर आल्याची शोकांतिका मांडली.
पुरवणी मागण्यांवर चर्चा करतांना आ. सतिश पाटील यांनी एकदोन अभियंत्यांना निलंबित करून हा भ्रष्टाचार संपणार नाही तर मुळावर घाव घालावा लागेल. गैरव्यवहाराचे पुरावे उपलब्ध असतांना भ्रष्टाचाराचे मुळ असलेले कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके कारवाईच्या कक्षेतून मोकळ्या कशा? असा त्यांच्या मागणीचा रोख होता. आमदार निवासातील डॉ. सतिश पाटील यांच्या कक्षाचा स्लब कोसळल्याचे उदाहरणही सभागृहासमोर ठेवले. डी-24 या कक्षाचा स्लब कोसळला तेंव्हा आ. पाटील कक्षात नव्हते म्हणून अघटीत टळले हे उदाहरण देऊन आ.पाटील यांनी साबांचा हा भ्रष्टाचार लोकप्रतिनिधींच्या जीवावर उठूनही साबां मंत्री भ्रष्ट कार्यकारी अभियंत्यांना वाचविण्याची धडपड का करतात? असा रहस्यमय सवाल उपस्थित केला.
मनोरा आमदार निवासातील गैरव्यवहारावर बोलतांना आ. सतिश पाटील यांनी साबांतील भ्रष्ट प्रवृत्तींच्या कार्यपध्दतीचे उदाहरणा दाखल आम्ही मागणी न करताही तीन तीन लाखाचे सोफा कम बेड कशासाठी देता? असा सवाल करून या पैशात आमदारांच्या मतदार संघात रस्त्याची कामे होऊ शकली असती. अशा रितीने विधानसभेत आजही शहर इलाखा विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या गैरव्यवहार चर्चेच्या निमित्ताने साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यक्षमतेचे धिंडवडे निघाले. दरम्यान उद्या बुधवारीही या मुद्यावर आ. विरेंद्र जगताप यांची लक्षवेधी चर्चेला येणार असून साबां मंत्री त्या लक्षवेधीला काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तुर्तास प्रज्ञा वाळके यांचा हा गैरव्यवहार साबांची उरलेली प्रतिष्ठाही डेब्रीजच्या धुळीत मिळण्यास कारणीभूत ठरला असून साबां मंत्र्यांसमोर भ्रष्ट अभियंत्यांवर कारवाई करणे हा एकच मार्ग शिल्लक असल्याची चर्चा उपराजधानीत आहे.
आ.चरणभाऊ वाघमारेंच्या लक्षवेधी मुस्कटदाबीची प्रज्ञा शैली
सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही साबांतील भ्रष्टाचारावर निरपेक्षपणे आवाज उठवून विधानसभा सभागृहात लक्षवेधी आणणारे आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या हक्काची मुस्कटदाबी करण्याचा प्रमाद गैरव्यवहाराच्या मास्टर माईंड कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी केल्याची चर्चा साबांत आहे. साबांत कार्यालयीन काम करणार्या अधिकारी कर्मचार्यांनी ही चर्चा आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या कानावर दबक्या सुरात टाकली असून या कामी प्रज्ञा वाळके यांना साबां मंत्र्यांचे खाजगी सचिव श्रीनिवास जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याचे स्पष्ट केले.
विधानपरिषदेतही साबां मंञ्यावर विरोधकांचा हल्लाबोल
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यकुंडलीत शहर इलाखा साबां विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या गैरव्यवहाराचे ग्रहदोष निर्माण झाल्याचे चित्र मंगळवारी वरिष्ठ सभागृहातही दिसले. विधानपरिषदेमध्ये पुरवणी मागणी प्रश्नउत्तराच्या वेळी मनोरा आमदार निवास इमारतीच्या कामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी आणलेल्या पुरवणी मागणी चर्चेत साबां मंत्री चंद्रकांतदादा पाटील विरोधकांच्या टीकेचे धनी ठरले. पुरवणी मागण्यांच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या श्रीमती हुस्नबानू खलिफे यांनी मनोरा आमदार निवास इमारतीतील कामात झालेल्या गैरव्यवहारावर कारवाई संदर्भात सरकारकडून होत असलेल्या अक्षम्य कुचराईबाबत साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर कठोर शब्दात हल्लाबोल केला.

मंत्रालय इमारत आणि मनोरा आमदार निवास इमारत या दोन्ही इमारती राज्य शासनाच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने अतिमहत्वाच्या मानल्या जातात. या इमारतींची देखभाल दुरूस्ती आणि सुरक्षा या गोष्टींवर शासनाचे विशेष लक्ष असते, राज्याचे नाक मानलेल्या या अतिमहत्वाच्या इमारतीतच शहर इलाखा साबां विभागाच्या माजी कार्यकारी अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके यांनी त्यांच्या कार्यकाळात पाच कोटींचा घोळ करून राज्य शासनाच्या प्रतिष्ठेचे नाक कापण्याचे धाडस दाखवले. शासन प्रशासन पातळीवरील जबाबदार उच्चपदस्थांचा आशीर्वाद असल्याशिवाय कार्यकारी अभियंता पदावर असलेल्या प्रज्ञा वाळके यांच्या सारखे अभियंता हे धाडस करू शकत नाही ही साबां वर्तुळात सुरू असलेली तत्कालीन चर्चा कालांतराने आ.चरणभाऊ वाघमारे यांच्या तक्रारीवर झालेल्या कारवाईतून खरी असल्याचे निष्पन्न झाले.
उपलब्ध कागदपत्रांवरून या प्रकरणाच्या मुळ सुत्रधार असलेल्या प्रज्ञा वाळके यांना अलगद बाजूला काढून त्यांच्या आदेशावर काम करणार्या दोन सहअभियंत्यांना निलंबित करण्याची तत्परता साबां प्रशासनाने दाखवली. तेंव्हाच हा मुद्दा या गैरव्यवहाराचा बळी ठरलेले तक्रारदार आ. चरणभाऊ वाघमारे यांच्यासह अन्य आमदारांच्या हक्क प्रतिष्ठेचा ठरला होता. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या विषयावर गरमागरम चर्चा होणार हे तेंव्हाच निश्चित झाले होते. अपेक्षेप्रमाणे आ. चरणभाऊ वाघमारे यांच्यासह 57 आमदारांनी विधानसभेत तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत या मुद्यावर लक्षवेधी आणली.