‘डीएसकें’ना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
मुंबई : गुंतवणूकदारांचे 50 कोटी रुपये जमा करण्यास मुदत वाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना नकार दिला. त्यामुळे डीएसकेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
15 दिवसांपूर्वी डीएसकेंना 50 कोटी रुपये जमा करण्यास न्यायालयाने मुदत वाढ दिली होती. ती मुदत आज संपली. त्यामुळे मुदत वाढ मिळण्यासाठी डीएसकेंनी अर्ज केला. मात्र त्यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.