कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याऐवजी स्थलातंरित
नागपूर : विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि शिक्षण हक्क कायम राखण्यासाठी राज्यातील 0 ते 10 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याऐवजी स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. यासंदर्भात शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत नियम 93 अन्वये उपस्थित केलेल्या सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते.
संदर्भात शिक्षणमंत्री म्हणाले की, 0 ते 20 पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय हा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या कारकिर्दीतच घेण्यात आला होता. पण हा निर्णय आमच्या सरकारने अंमलात आणला नाही. वीस पटसंख्या असलेल्या सुमारे 12 हजार शाळा तर 10 पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या 5 हजार 600 इतकी आहे. यापैकी सर्वच नाही तर ज्या शाळांची पटसंसख्या 10 पेक्षा कमी आहे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले. ज्या शाळांची पटसंख्या 10 पेक्षा कमी आहे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन होत नाही.
तसेच त्या शाळेत क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन होत नाही, त्यामुळे हा विद्यार्थी सामाजिकिकरणाच्या प्रक्रियेपासून दूर राहतो. पण कमी पटसंख्या असलेल्या शाळेपासून जवळच्या ज्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या 65 ते 70 आहे, अशा शाळांमध्ये या विदयार्थ्यांना सामावून घेण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांचेही समायोजन करण्यात येणार आहे. जेणे करुन कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समविष्ट होऊ शकेल आणि विद्यार्थ्यांचे हित जपले जाईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
तसेच शासनाने घेतलेला निर्णय हा फक्त विदयार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. गुगल मॅपच्या सहाय्याने आणि प्रत्यक्ष सर्वेक्षण करुन या शाळा शोधण्यात आल्या आहेत. तरीही शिक्षक आमदारांनी कमी पटसंख्या असलेल्या शाळेचे स्थलांतर एक किलोमीटरहून अधिक दूर अंतरावर झाले असल्याचे निर्दशनास आणून दिल्यास आपण ती नक्कीच दुरुस्त करु, असे आश्वासनही तावडे यांनी सभागृहात दिले.