Breaking News

अमरावतीत रेमंडने सुरु केला नवा प्रकल्प

नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये अमरावतीत वस्त्रोद्योगातील अग्रणी कंपनी रेमंडने आपला पहिला लिनेन निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. यासाठी २५० कोटी रुपये गुंतवणूक केली असून या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याची क्षमता दुप्पट करण्याची योजना आहे, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया यांनी दिली. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे अलीकडेच उद्घाटन केले. रेमंडची सहकंपनी रेमंड लक्झरी कॉटन्स लि. द्वारा हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामध्ये १२०० टन लिनेन धागा, ४८ लाख मीटर लिनेन व अन्य प्रकारचे वस्त्र तयार करण्याची वार्षिक क्षमता आहे. यामधील उत्पादनापैकी ७० टक्के भाग रेमंड स्वत:च्या उत्पादनांसाठी व अन्य ३० टक्के देशांतर्गत बाजारपेठ व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी असणार आहे.