Breaking News

अनाथ मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल - पंकजा मुंडे


पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या बाल सुधारगृहात झालेल्या अल्पवयीन अनाथ मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल केल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य ॲड. जयदेव गायकवाड यांनी लैंगिक शोषणाबद्दल प्रश्न विचारला होता. श्रीमती मुंडे म्हणाल्या लैंगिक शोषण प्रकरणी विभागीय उपआयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती गठित करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरु केली असून काही कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. या प्रकरणात अडकलेल्या आठ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला असून त्यांच्यावरही कारवाईकरण्यात येणार आहे.