Breaking News

'नोटा'ला गुजरातेत १.८ टक्के, हिमाचलमध्ये ०.९ टक्के मते

नवी दिल्ली : गुजरातमधील जवळपास १.८ टक्के तर हिमाचल प्रदेशातील जवळपास ०.९ टक्के मतदारांनी 'नन ऑफ दि अबोव्ह' म्हणजेच 'नोटा' या पर्यायाची निवड केल्याचे निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहे. गुजरातमधील सुमारे साडेपाच लाख मतदारांनी तर हिमाचलमधील सुमारे ३३ हजार मतदारांनी 'नोटा' या पर्यायाचे बटन दाबल्याचे निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. 


या निवडणुकीत भाजपला गुजरातमध्ये सर्वाधिक ४९ टक्के तर हिमाचलमध्ये ४८.७ टक्के मते मिळाली. त्यानंतर काँग्रेसला गुजरात व हिमाचल दोन्ही राज्यांत जवळपास ४२ टक्के मते मिळाली. गुजरातमध्ये अपक्ष उमेदवारांनी जवळपास ४.२ टक्के मते तर हिमाचलमध्ये ६.३ टक्के मते घेतली. त्यानंतर 'नोटा' या पर्यायावर गुजरातमध्ये जवळपास १.८ टक्के तर हिमाचलमध्ये ०.९ टक्के इतके मतदान झाले.