Breaking News

सेक्स स्कॅन्डलची चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक, दि. 16, डिसेंबर - सिन्नर तालुक्यातील सेक्स स्कँन्डलची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आ.जयवंतराव जाधव यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते.


आमदार जयवंतराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, मुसळगाव ता.सिन्नर जि.नाशिक येथे अल्पवयीन बांग्लादेशी मुलीला फसवून सेक्स स्कँन्डलमध्ये टाकण्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात देहव्यापार केला जात असूनही याकडे येथील पोलिसांकडून क ानाडोळा केला जात आहे. येथील सेक्स स्कँन्डलची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लेखी पत्राद्वारे केली आहे.