सरकारच्या विरोधात आक्रमक होणार : सुनील तटकरे
नागपूर : सरकारच्या धोरणाच्या विरोधात राज्यातील विविध कर्मचार्यांचा असलेला संताप, अधिवेशनाच्या कालावधीमध्ये निष्क्रिय निघालेले सरकार आणि शेतकर्यांच्याप्रती असलेले सरकारचे विरोधी धोरण, राज्यात निर्माण झालेली कायदा आणि सुव्यवस्था यासर्व बाबी येत्या काही दिवसामध्ये कशापध्दतीने मांडल्या जाव्यात याबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली.
यासंदर्भात माहिती देताना तटकरे म्हणाले की, गुजरातच्या निकालाने देशातील राजकीय ध्रुवीकरणाच्या प्रक्रियेला वेग येवू शकतो. त्यादृष्टीने संघटनेचा पायाभूत विस्तार अधिक मजबुत करावा अशा वेगवेगळ्या विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. गुजरातच्या निकालाने भारतीय राजकारणात बदल होवू शकतो. देशातील जनता 2019 मध्ये पर्यायी विचार करु शकते हे गुजरातच्या निकालाने असा संदेश भारतीय राजकारणाला दिला आहे. भाजपाच्या विरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. एका बाजुला धनशक्ती आणि दुसर्या बाजुला जनशक्ती आहे. जनशक्ती ही जर एकवटायची असेल तर त्याला समविचारी पक्षांची मोट एकत्रित बांधण्याची गरज आहे. काँग्रेसने याकामात पुढाकार घ्यावा हे अत्यंत आवश्यक आहे असेही तटकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी हल्लाबोल आंदोलनात सहभागी झालेल्या पक्षातील नेत्यांचे अभिनंदन केले.