Breaking News

गुजरात निवडणुकीवर तब्बल एक हजार कोटींचा सट्टा


गुजरात निवडणुकीची सर्व सूत्र मोदींनी हाती घेतल्यापासून भाजपचा विजय जवळपास नक्की झालाय, असं सट्टेबाजांचा अंदाज आहे. पण 2012 पेक्षा भाजपला कमी जागा मिळतील, असंही सट्टेबाजांना वाटतंय. 


गुजरात निवडणूक तर आता या सट्टेबाजांसाठी हॉट केक आहे. कारण संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणूकांवर केंद्रीत झालंय. भाजप आणि काँग्रेस दोघांसाठीही ही महत्वाची लढाई आहे. निवडणूकांचं चित्र जसं बदलतंय, तशी सट्टेबाजाराच्या आकड्यांमध्ये चढउतार होतोय. सट्टेबाजारात सध्या भाजपचा भाव वधारला असून गुजरात निवडणुकीवर तब्बल एक हजार कोटींचा सट्टा लागल्याचं बोललं जातंय.


भाजपच्या प्रत्येक जागेसाठी 1 रुपयाला 1.25 पैसे

काँग्रेसच्या प्रत्येक जागेसाठी 1 रुपयाला 3 रुपये

आपच्या प्रत्येक जागेसाठी 1 रुपयाला 10 रुपये

शिवसेनेच्या प्रत्येक जागेसाठी 1 रुपयाला 25 रुपये

राष्ट्रवादीच्या प्रत्येक जागेसाठी 1 रुपयाला 30 रुपये