Breaking News

कर्जमाफीच्या यादया बँकांकडे येण्यास सुरूवात !

औरंगाबाद, दि. 05, नोव्हेंबर - मराठवाडयात कर्जमाफीच्या यादया बँकाकडे येण्यास सुरूवात झाली असल्याने शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जालन्यात  बँक ऑफ महाराष्ट्रला पहिल्या यादीतील शेतक-यांसाठी सुमारे 30 कोटी रुपये वाटपासाठी उपलब्ध झाले आहेत तर जालना येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुख्य शाखेच्या बँकेचे  खातेदार असलेल्या एक हजार सत्त्याहत्तर शेतक-यांची कर्जमाफीची पहिली यादी मिळाली असल्याचे समजताच शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. योग्य ती कारवाई पूर्ण झाल्यानंतर  शेतक-यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत हीच स्थिती औरंगाबाद , बीड,परभणी आदी शहरात असल्याने शेतकरी आता बँकात गर्दी करू लागला आहे.आपले नाव कोणत्या  यादीत आहेत हे विचारले जात आहेत तसेच मोबाईलवर या बाबत संदेश केेव्हा येणार याचीही वाट ते पाहत आहेत. हिरव्या ,पिवळया आणि लाल रंगाच्या यादया आहेत.