सांगली महापालिकेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शक्य?
सांगली, दि. 05, नोव्हेंबर - केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्ष सरकारचा कारभार पाहता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ सांगली महापालिका निवडणुकीतच नव्हे, तर राज्य पातळीवरील सर्वच निवडणुकीत एकत्र यावे, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचा प्रस्ताव दिल्यास सकारात्मक विचार केला जाईल, असे प्र तिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले.
अवघ्या आठ महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आता स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यक र्त्यांना विश्वासात घेऊन बांधणी सुरू केली आहे. महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक यांच्या कामकाजाबाबत सध्या सर्वसामान्य जनतेत नाराजी आहे.
वास्तविक, महापालिका आयुक्त यांच्यासमवेत पदाधिकार्यांचा बेबनाव झाल्यानेच ही परिस्थिती ओढवली आहे. त्यात लवकरच सुधारणा झालेली दिसेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. काँग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार डॉ. पतंगराव कदम यांची महापौर हारूण शिकलगार व आयुक्त रविंद्र खेबूडकर यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच सर्वांची व्यापक बैठक घेऊन समेट घडवून आणला जाईल.
महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ आमच्यापेक्षा निम्मेही नाही. महापालिका क्षेत्रात भाजपची ताकद ङ्गारशी नाही. तरीही समविचारी या दोन्हीही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसकडून आल्यास महापालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी झालेली दिसेल. अन्यथा, काँग्रेस पुन्हा एकदा स्वबळावर महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यास आजही सक्षम आहे, असा दावाही विश्वजित कदम यांनी केला.