Breaking News

सहाय्यक अभियंत्यांच्या विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल

जालना, दि. 05, नोव्हेंबर - रस्त्याचे काम न करताच 70 लाखांची बोगस देयके उचल्याप्रकरणी जालन्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन सहाय्यक अभियंत्यांच्या  विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल झाल्याने बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने लोकायुक्तांकडे रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली होती त्यानंतर हे  प्रकरण उजेडात आले. 
पाच वर्षापुर्वी हट्टा ते तळणी शिवगिरी मार्गाचे काम हर्षवर्धन मजूर सहकारी संस्था आणि तुळजा भवानी मजूर सहकारी संस्था या मजूर संस्थांना दिल्याचे दाखविले आणि प्रत्यक्षात  मात्र हे काम केले गेले नाही.त्या नावावर 70 लाखांची देयके काढून अपहार केला. चौकशीअंती कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम देवरे यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन कार्यकारी अ भियंता पी.पी. भागवत, के.ई कांबळे, जी.एच. राजपूत,डी. एस. बेलापटे तत्कालीन उपअभियंता ए. के. ताजी, शाखा अभियंता डी. एन. गायकवाड, लेखा अधिकारी डी. एन. गायक वाड, पी.पी. थूळ, ए. आर. श्रीवास्तव यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच आरोपींत हर्षवर्धन मजूर सहकारी संस्था आणि तुळजा भवानी मजूर सहकारी संस्था  यांच्या अध्यक्षांचा सहभाग आहे.