Breaking News

आधार लिंक केल्यानंतर बुक करता येणार रेल्वेची सहापेक्षा जास्त तिकीटे

पुणे, दि. 04, नोव्हेंबर - रेल्वे प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी असून आयआरसीटीसीच्या माध्यमातून प्रवाशांना सहा पेक्षा जास्त तिकिटे बुक करता येणार आहेत. मात्र त्यासाठी आपले आधार कार्ड आयआरसीटीसी खात्याशी लिंक करावं लागेल. आत्ता पर्यंत एका महिन्यात प्रवाशांना केवळ सहाच तिकीटे बुक करता येत होती. दलालांकडून होणारा रेल्वे तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2016 पासून नवीन नियम काढला. या नियमानुसार, आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरील एका युजर आयडीवरून एका महिन्यात जास्तीत जास्त केवळ सहा तिकीटे बुक करता येत होती.नुकतीच आयआरसीटीसीने ट्विटरवरून माहिती दिली आहे की, एका महिन्यात एका आयडीवरून सहा पेक्षा जास्त तिकीटे बुक करण्यासाठी प्रवाशांना आपले आधार कार्ड आयआरसीटीसी खात्याशी लिंक करावे लागणार आहे. सहा तिकीटे बुक करण्यासाठी आधारकार्डची गरज नाही. मात्र आधार कार्ड आयआरसीटीसी खात्याशी लिंक केल्यानंतरही एक प्रवासी एका महिन्यात 12 पेक्षा जास्त तिकीटे बुक करू शकणार नाही. आयआरसीटीसी खात्याशी कसे कराल आधार लिंकआयआरसीटीसी खाते आधारसोबत लिंक करण्यासाठी लॉगिन केल्यानंतर होमपेजवर प्रोफाईल सेक्शनमध्ये जा, इथे आधार केवायसी वर क्लिक करा. तुमची महत्वाची माहिती तिथे भरा. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या आधार कार्डची सर्व माहिती समोर येईल ती सबमिट करा. यानंतर तुमचे आधार कार्ड आयआरसीटीसी खात्याशी लिंक होईल.