बदलीत राजकीय हस्तक्षेप आणल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार
पुणे, दि. 13, नोव्हेंबर - महापालिकेमध्ये कर्मचारी तसेच अधिकार्यांच्या बदल्यांमध्ये गेल्या काही महिन्यात मोठया प्रमाणात राजकीय हस्तक्षेप वाढले आहेत. त्याला लगाम घालण्यासाठी या पुढे बदली केल्यानंतर एखाद्या कर्मचार्याने बदली रद्द करण्यासाठी राजकीय दबाव अथवा हस्तक्षेप आल्यास संबधित कर्मचार्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने बदली आदेशामध्येच या अटीचा समावेश केला आहे. त्यासाठी प्रशासनाने तब्बल 13 वर्षांनंतर 2004 मध्ये महापालिकेच्या मुख्यसभेने केलेल्या एका ठरावाचा आधार घेतला आहे.
गेल्या काही महिन्यात महापालिकेत कर्मचार्यांची बदल्यांवरून पालिका प्रशासन आणि पदाधिकार्यांमध्ये वारंवार खटके उडत आहेत. त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत असून राजकीय पदाधिकार्यांच्या दबावाने बदली रद्द करून घेता येत असल्याने अनेक कर्मचारी कामावर रुजू होत नसल्याचे चित्र आहे.
गेल्या काही महिन्यात महापालिकेत कर्मचार्यांची बदल्यांवरून पालिका प्रशासन आणि पदाधिकार्यांमध्ये वारंवार खटके उडत आहेत. त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत असून राजकीय पदाधिकार्यांच्या दबावाने बदली रद्द करून घेता येत असल्याने अनेक कर्मचारी कामावर रुजू होत नसल्याचे चित्र आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने एकाच क्षेत्रीय कार्यालयात दहा ते 15 वर्षे काम करणार्या आरोग्य निरिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. तसेच वेगवेगळया विभागातील कनिष्ठ अभियंत्यांच्याही बदल्या करण्यात आलेल्या करण्यात आलेल्या होत्या.मात्र, त्यावरून महापालिका आयुक्त आणि पालिका पदाधिकार्यांमध्ये चांगलेच वाद झाले.
नंतर हा वाद पालकमंत्री गिरिश बापट यांच्या हस्तक्षेपाने मिटला होता. असे असतानाच; मागील महिन्यात स्थायी समितीने पुन्हा मार्च 2018 पर्यंत कनिष्ट अभियंत्याच्या बदल्या करू नयेत असा ठराव केला होता. मात्र, त्याच दिवशी प्रशासनाकडून अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
त्यामुळे संतापलेल्या स्थायी समिती सदस्यांनी पुन्हा महापालिका आयुक्तांसह संबधित प्रशासकीय अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे राजकीय हस्तक्षेपाने प्रशासकीय कामात अडथळे वाढल्याने प्रशासनाने त्याची गंभीर घेत बदलीच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. हे बदल बदलीच्या आदेशात ठऴकपणे नमूद करण्यात येत आहे.
