Breaking News

अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

संगमनेर, दि. 30, ऑक्टोबर - संगणक अभियांत्रिकी विभागात मागील तीन वर्षांपासून रेडहॅट सर्टिफिकेशन महाविद्यालयात खठढ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने  चालू आहे. सन 2017 -2018 यावर्षांत 25 विद्यार्थी रेडहॅट सर्टिफिकेशन झाले. त्यातील 4 विद्यार्थ्यांना 300 पैकी 300 मार्क्स मिळाले आहे. नोकरीच्या दृष्टीने विविध कौश्यल म्हणजे गुणवतेबरोबर सर्टिफिकेशन पाहिजे. जागतिक कंपन्यांच्या नोकरीसाठी रेडहॅट सर्टिफिकेशन महत्वाचे मानले जाते. चतुर्थ आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यात घवघवीत यश मिळविले.
यामध्ये रजत पाटील, निशांत काळे, गणेश फापाळे, विशाल चौधरी, स्वप्नील देऊळगावकर, श्‍वेता खोजे, परेश पाटील, सिद्धांत जैन, शरफा मलिक, अक्षय पाटील, शिवकुमार खुराणा, श्रुतिका सारडा, संकेत वाबळे, अभिषेक येवला, प्रिया गीते, कल्याणी गोरे, ललित शिंदे, विठ्ठल शिरसाठ, शुभम थोरात, स्नेहल सरोदे सुजित थोरात, सुदर्शन देवरे, भारती यादव, जयेश देव, अर्जुन गजमल आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात साहेब, विश्‍वस्त डॉ. सुधीरजी तांबे,  विश्‍वस्त शरयू देशमुख आणि कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, उपप्राचार्य प्रा. ए. के. मिश्रा, डॉ. एम . आर . वाकचौरे ( डीन अकॅडेमिक्स), रजिस्ट्रार प्रा. विजय वाघे, विभाग प्रमुख प्रा. राहुल पाईकराव यांनी  अभिनंदन  केले.