Breaking News

युटेक शुगरचा गळीत हंगाम उत्साहात

संगमनेर, दि. 30, ऑक्टोबर - साखर निर्यातीवरील सबसिडी कारखान्यांना लवकर मिळाली तर तोट्यातील कारखान्यांना तेवढेच जीवदान व प्रोत्साहन मिळेल, त्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, ऊस उत्पादकांसह सर्वच घटक या उद्योगावर अवलंबून असल्यामुळे संकटातून बाहेर काढण्यासाठी कारखान्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.  
तालुक्यातील कौठे मलकापूर येथे सुरू झालेल्या युटेक शुगरच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आ. प्रवीण दरेकर, आ. स्नेहलता कोल्हे, माजी मंत्री बबनराव पाचपुते आदी यावेळी उपस्थतीत होते. तालुक्यातील साकुर पठार वरील दुष्काळी भाग म्हणून ओळखले जाणार्‍या  कौठेमलकापुर येथील खडकाळ  माळरानावर उद्योजक रविंद्र बिरोलेंनी प्रतिकुल परीस्थितीत अनेक अडथळे पार करत  नव्यानेच निमिॅती होत असलेल्या युटेक शुगर लिमिटेड साखर कारखान्याची उभारणी केली आहे. या साखर कारखान्याच्या पहिल्याच गळीत हंगामाचा शुभारंभ व  3500 टी. सी. डी साखर कारखाना व  14. 9 मेगावॅट सहविजनिमिॅती प्रकल्पाचे उदघाटनदेखील यावेळी पार पडले.
राज्यात यंदा सर्वदूर पाऊस चांगला झाल्याने ऊसाचे विक्रमी गाळप होऊन साखर उत्पादनात वाढ होईल. तोट्यातील साखर कारखान्यांना जीवदान देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. राज्यातील  साखर कारखानदारी समोरील संकट व आव्हाने विषद केली. ऊस व साखरेच्या दराचा ताळमेळ बसणे कठीण होत चालल्याने साखर कारखाना चालवणे म्हणजे सध्या तारेवरची कसरत आहे. यंदा सर्वदूर पाऊस चांगला झाला ही कारखाना व ऊस उत्पादकांसाठी जमेची बाजू आहे. पुढील वर्षी बर्‍यापैकी पाऊस झाला तरी ऊसाची स्थिती चांगली राहील.