ग्रामसभेत वायरमनच्या उपस्थितीत महावितरणचा निषेध
पढेगाव, दि. 30, ऑक्टोबर - गेल्या चार दिवसांपासून महावितरण कंपनीने थकबाकी अभावी कृषीपंपाची वीज तोडण्याची मोहिम हाती घेतली. त्यातून अद्यापपर्यंत तरी कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे पढेगावच्या शेतकर्यांनी वायरमनला बोलवून त्याच्या उपस्थितीत ग्रामसभा घेतली. ग्रामसभेत संतप्त ग्रामस्थांनी महावितरण कंपनीचा तीव्र निषेध नोंदविला.
पढेगावात तीन रोहित्र नादुरुस्त असून त्यातील गावठाण हद्दीतील ग्रामपंचायत पाणीपुरवठा असलेले शंभर एच. पी. चे नादुरुस्त रोहित्र बदलून देउनही तेदेखील बंदच असल्याने अद्यापपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालाच नाही. गावात सध्या तीन रोहित्र बंद आहेत. वीजबिले भरुनही नादुरुस्त असलेले रोहित्र एक ते दीड महिना बदलून मिळत नाही. त्यामुळे शेतकर्यांना पिके वाचविण्यासाठी स्वखर्चाने ते दुरुस्त करुन घ्यावे लागत आहेत. त्यामुळे सेवा देण्याच्या नावाने हात वर करणारी महावितरण कंपनी केवळ बिलासाठीच उरली आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला. याशिवाय रात्रीची वीज देऊन सत्वपरिक्षा बघण्यापेक्षा दिवसभरात कमीत कमी पाच तास कृषीपंपासाठी वीज पुरवठा करुन सध्या अडचणीत असलेल्या शेतकर्यांना वीजबिल भरण्यास मुदत द्यावी, यासाठी वीजपुरवठा बंद करुन शेतकर्यांच्या जीवनाशी खेळू नये, असे कळकळीचे आवाहन ग्रामस्थांनी महावितरण कंपनीचा प्रतिनिधी असलेल्या वायरमनला उपस्थित ग्रामस्थ आणि शेतकर्यांनी केले.
आजूबाजूच्या गावांतील वीजपुरवठा सुरळीत असून केवळ पढेगाव कृषीपंपाची वीज खंडीत करुन जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याची खंत शेतकर्यांनी व्यक्त केली. चार दिवसांपासून खंडीत वीजपुरवठ्यामुळे कांदा लागवडीचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकर्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे.
20 टक्के रक्कम भरल्यास रोहित्र
नादुरुस्त रोहित्राबाबत वरीष्ठांशी चर्चा झाली असून शेतकर्यांनी वीस टक्के रक्कम तात्काळ भरुन महावितरणकडे रोहित्राची मागणी केल्यास दोन दिवसांत विलंब न करता रोहित्र बदलून देण्यात येईल.