Breaking News

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शक्य - डॉ. पतंगराव कदम

सांगली, दि. 31, ऑक्टोबर - केंद्र व राज्य स्तरावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबत सकारात्मक बोलणी सुरू आहे. याचा लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे.  त्यामुळे आगामी सांगली महापालिका निवडणुकीतही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्यावतीने लढविली जाईल, अशी शक्यता काँग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार डॉ. पतंगराव  कदम यांनी व्यक्त केली.
भारतीय जनता पक्षाच्या अच्छे दिनचा सर्वसामान्य जनतेला चांगलाच अनुभव येऊ लागला आहे. शेतकरी कर्जमाफी असो की नोटांबदीचा निर्णय भाजपच्या प्रत्येक निर्णयाला जनता  वैतागलेली आहे. ज्यांची नावेच कर्जमाफी यादीत नाहीत, त्यांना या सरकारने कर्जमाफी देऊ केली आहे. त्यातूनच ही फसवी कर्जमाफी असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी टीका करू न डॉ. पतंगराव कदम म्हणाले की या सरकारने जाणीवपूर्वक जाचक निकष लागू केल्यानेच शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया लांबली आहे. परिणामी हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वं चित राहणार आहेत.
काँग्रेस हा एकमेव असा राजकीय पक्ष आहे, की जो दिल्लीपासून गल्लीपर्यंत रूजलेला आहे. लोकसभा- विधानसभाच नव्हे, तर अनेक निवडणुकात काँग्रेसने चढउतार पाहिले आहेत.  गत लोकसभा- विधानसभा निवडणुकीत मोदी लाट होती. मात्र आता ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या घोषणाबाजीला जनता कंटाळलेली असून पूर्वीचेच  दिवस बरे, अशी प्रतिक्रिया येत आहे. भाजप सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी राज्यस्तरावर संयुक्तपणे प्रयत्न सुरू केले आहेत. हीच प रिस्थिती सांगली जिल्ह्यातही दिसून येईल. सांगली महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने त्याठिकाणचा निर्णय कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच घेतला जाईल, असेही डॉ.  पतंगराव कदम यांनी सांगितले.