शेतक-यांसाठी सहकारी साखर कारखान्याची उभारणी करणार - अजित घोरपडे
सांगली, दि. 31, ऑक्टोबर - ऊस उत्पादक शेतक-याला चांगला दर मिळावा व त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर लवकरच नवीन सहकारी साखर कारखान्याची उभारणी करणार आहे, अशी घोषणा माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांनी केली.
अजित घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त कवठेमहांकाळ येथील जाधववाडी रस्त्यावरील श्री महांकाली मंगल कार्यालयात आयोजित प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत अजित घोरपडे बोलत होते. या बैठकीत विकास आघाडीच्यावतीने अजित घोरपडे यांचा सपत्नीक कौटुंबिक सत्कार करण्यात आला.
कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्या विकासासाठीच विकास आघाडी या संघटनेचा जन्म झाला. आजवर या विकास आघाडीचा कारभार सर्वसामान्यांच्या हिताचाच असल्याने ही एक जिव्हाळ्याची संघटना बनली आहे. विकास आघाडीच्या माध्यमातून काय होऊ शकते, हे वारंवार दाखवून दिले आहे. सत्ता असो अथवा नसो, आपण विकास आघाडीच्यावतीने यापुढील कालावधीत शेतीला नवी दिशा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सर्वांनीच आपापसातील मतभेद बाजूला ठेवून विकास व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावयाची आहे, असे आवाहनही अजित घोरपडे यांनी केले.