Breaking News

वीज बील भरत नसलेल्या ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा बंद

औरंगाबाद, दि. 31, ऑक्टोबर - थकीत वीजबील भरत नसलेल्या ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा बंद करण्याचा निर्णय विद्युत मंडळाने घेतला असून औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक  ग्रामपंचायतींची 38 कोटींची वीजबिल थकबाकी आहे. 
नऊ तालुक्यांमधील 1387 कनेक्शनपोटी सुमारे 38 कोटींची वीजबिल थकबाकी कित्येक वर्षांपासून थकित आहे. काही ग्रामपंचायतींकडून थोडीफार रक्कम भरून तात्पुरत्या  स्वरुपात वीजपुरवठा सुरळीत करून घेतला पण सर्व ग्रामपंचायतींचे मिळून 38 कोटी 4 लाख 23 हजार 232 रुपये थकबाकी आहे. यापोटी महावितरणे अनेक ग्रामपंचायतींचा  वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम झालेला आहे. महावितरणच्या अधिका-यांना झेडपीच्या अधिका-यांनी पत्र लिहून तोडगा काढण्याचे  सूचविले होते, पण थकित रकमेच्या ठराविक रक्कम भरण्याबाबत पर्याय सूचविला होता. ग्रामपंचायतींना मिळणा-या करातून ही रक्कम भरण्याबाबत विचार चालू असून अद्यापतरी काही  काम हालचाली नसून विदयूत मंडळाने या गावांच्या पाणी पुरवठयाचे कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे.