Breaking News

बोगस नियुक्तीपत्रावर घाटी अधिष्ठातांची बनावट स्वाक्षरी करणा-या युवकास अटक

औरंगाबाद, दि. 31, ऑक्टोबर - बोगस नियुक्तीपत्रावर घाटी अधिष्ठातांची बनावट स्वाक्षरी करणा-या सुनील बन्सीलाल डोणगांवकर या आरोपीला पोलिसांनी अटक केली. या प्रक रणी राजेंद्र पोहाल याला आधीच पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
घाटी रूग्णा लयात नोकरी देण्याचे अमिष दाखवून बारा गरजू तरूणांना लुटण्याच्या कारस्थानातील पहिला आरोपी राजेंद्र पोहाल याने प्रत्येकी दोन लाख रुपये याप्रमाणे 24 लाख  रुपये लाटले होते. नंतर या तरूणांनी तगादा लावल्यानंतर त्यांना अधिष्ठातांच्या सह्या आणि शिक्का मारलेली बोगस नियुक्तीपत्रे दिली. त्याने 50 लिपीक आणि 48 शिपाई पदांची  निवड यादी त्यांना दाखविली. या नियुक्तीपत्रावर अधिष्ठातांच्या सह्या होत्या त्या सुनील डोणगावकर याने मारल्याची कबुली पोहाल याने पोलिस कोठडीत दिल्यानंतर पोलिसांनी काल  सुनिलला त्याच्या घरून अटक केली. सुनिल हा डीटीपी ऑपरेटर असून पोहालने त्याला मोबाईल हॅन्डसेट देण्याचे अमिष दाखवून त्याच्याकडून बोगस नियुक्तीपत्रे तयार करून  घेतली. किशोर चंद्रभान देहाडे या फसवल्या गेलेल्या तरूणाने दिलेल्या तक्रारी नंतर हे प्रकरण उघडकीस आले.