दोन तोंड असलेले बाळ जन्मले
बीड, दि. 31, ऑक्टोबर - अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रसुती विभागात काल रात्री एका महिलेने दोन तोंड असलेल्या बाळाला जन्म दिला. प्रसुतीशास्त्र विभागातील सर्जन तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय बनसोडे आणि त्यांच्या सहका-यांनी ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली.
परळी तालुक्यातील एक महिला बाळंतपणासाठी दाखल झाली होती. तीच्यावर उपचार करतांना व तीची पुर्वीची कागदपत्रे तपासतांना तिच्या पोटातील बाळ अबनॉर्मल आहे हे लक्षात आल्यानंतर सर्व दक्षता घेत डॉ. संजय बनसोडे यांनी महिलेचे सीझर करुन बाळाला बाहेर काढले असता बाळाला दोन तोंड असल्याचे लक्षात आले. सदरील बाळाचे वजन 3 किलो 700 ग्रॅम असून या बाळाला दोन डोके, दोन किडणी आणि दोन फुफ्फुससे आहेत. या महिलेला यापुर्वी तीन मुली आणि एक मुलगा आहे.