एम. जे. कॉलेजमध्ये कुस्ती स्पर्धा उत्साहात
जळगाव, दि. 31, ऑक्टोबर - मू.जे. महाविद्यालय आयोजित उमविअंतर्गत आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा एकलव्य क्रीडा संकुलात पार पडल्या. स्पर्धेत 51 मल्लांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत पहिल्या कुस्तीमध्ये वरणगाव महाविद्यालयाचा सय्यद शकील विजयी झाला.
या वेळी ज्येष्ठ मल्ल दिलीप घुले यांचा सत्कार केला. पंच म्हणून दिलीप सांगीले, हरीश भामरे यांनी काम पाहिले. गुण लेखनाचे काम बंटी भागरे, तर टाइम किपरचे काम विनायक सोनवणे यांनी पाहिले. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी सूत्रसंचालन केले. सय्यद शकील (वरणगाव) राहुल डामरे (शेंदुर्णी) यांच्यात पहिली कुस्ती लावण्यात आली. यात शकील विजयी झाला.