Breaking News

राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील दुध उत्पादक शेतकरी अडचणीत

अहमदनगर, दि. 31, ऑक्टोबर - सरकारचे कायदे व नियम हे फक्त सहकारी दुध संघांनाच आहेत. खासगी दुध संघांना सरकारच्या नियमांचे कोणतेही बंधन नाही. सरकारच्या चुक ीच्या धोरणांमुळे सहकारी दुध संघांना दुधाचे भाव कमी करावे लागले आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला असल्याचा प्रतिपादन रणजित सिंह देशमुख  यांनी केले आहे.
शेडगांव येथील भाग्यलक्ष्मी सहकारी दुध संस्थेच्या वतीने आयोजित दुध उत्पादकांचा मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाग्यलक्ष्मी सहकारी दुध संस्थेच्या अध्यक्षपदी  शांताराम फड व उपाध्यक्षपदी साहेबराव सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रणजित देशमुख म्हणाले की, शासनाच्या नियमानुसार सहकारी दुध संघानी 27 रुपये बाजारभाव आहे. मात्र खासगी दुध संघांनी शासनाच्या नियमांना डावलून फक्त 24 रुपये भाव  दुध उत्पादकांना दिले. आता ही काही दुध संघ 20 ते 21 रुपये भाव शेतक-यांना देतात. मात्र सहकारी दुध संघांनी दुधाची दरवाढ कमी केली तर दुस-यांच दिवशी सरकारच्या नो टिसा संघांना दिल्या जातात. सरकारचे नियम फक्त सहकारी संघानाच लागू आहेत का, हे सरकारचे सहकारी संस्था बंद पाडण्याचे षडयंत्र तर नाही ना, असा सवाल ही त्यांनी केला.  काही दिवसांपूर्वी सर्व दुध संघ चालकांची बैठक मुख्यमंत्र्यांनी आयोजित केली होती. त्यामध्ये खासगी दुध संघांनी दरवाढ देणे आम्हाला परवडत नाही. पर्यायाने आम्हाला दुध संघ बंद  करावे लागतील अशी धमकी देत मुख्यमंत्र्यांची बोलती बंद केली. मात्र आपल्या दुध संघाने दुध उत्पादकांना चांगल्या प्रकारचे बाजारभाव आणि दुध रिबेट अनामत दिले आहे. सहक ारी संस्था टिकविण्याचे काम हे आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे आहे. कारण संस्था या आपल्या आहेत. दुध संघाने सरासरी भाव व रिबेट पकडून जवळजवळ 30 रुपये पर्यंत भाव  हा दुध उत्पादकांना दिला आहे. या दुध दरवाढीमुळे सहकारी दुध संघांना करोडे रुपयांचे तोटे सहन करावे लागले आहेत. अशा परिस्थितीत उत्तम, पारदर्शक व्यवहार व शिस्तबध्द  व्यवस्थापन या जोरावर आपल्या संघाची वाटचाल सुरु असल्याचे ही त्यांनी सांगितले.