आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत कोहली; मिताल राज अव्वल
मुंबई, दि. 31, ऑक्टोबर -विराट कोहली आणि मिताली राज या भारताच्या पुरुष आणि महिला संघांच्या कर्णधारांनी वन डे फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे पुरुष आणि महिलांच्या आयसीसी क्रमवारीत एकाचवेळी दोन भारतीय ‘नंबर वन’ झाल्याचा योग जुळून आला आहे. महिला फलंदाजांच्या क्रमवारीत मिताली राजनं दुसर्या स्थानावरुन पहिल्या स्थानावर उडी मारली. तिच्या खात्यात सर्वाधिक 753 गुण आहेत.
ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी 725 गुणांसह दुसर्या क्रमांकावर, तर न्यूझीलंडची अॅमी सॅटर्थवेट 720 गुण मिळवत तिसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. महिला गोलंदाजांमध्ये भारताची झुलन गोस्वामीने 652 गुण मिळवत दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेची मारिझाने कॅ प 656 गुणांसह अव्वल आहे. भारत आणि न्यूझीलंड संघांमधल्या मालिकेआधी, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. पण अवघ्या दहा दिवसांत डिव्हिलियर्सला पिछाडीवर टाकून, विराट पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान झाला. कोहलीनं न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 263 धावांचा रतीब घातला. त्यामुळे विराटची एकूण कमाई ही 889 गुणांची झाली असून, सचिननं 1998 साली केलेली सर्वाधिक गुणकमाई ही 887 होती. पहिल्या दहा जणांमध्ये कोहलीशिवाय एकमेव रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा वन डे रँकिंगमध्ये सातव्या स्थानावर तर महेंद्रसिंह धोनी अकराव्या स्थानी आहे.