Breaking News

वांद्रे झोपडपट्टी आग : शब्बीरसह 6 जणांना अटक; 10 फरार

मुंबई, दि. 31, ऑक्टोबर - वांद्रे स्थानकाच्या बाहेरील झोपडपट्टीत लावलेल्या आग प्रकरणी शब्बीर खानला पोलिसांनी अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी  सुनावण्यात आली. शब्बीरसह सहा जणांना अटक केली असून 10 जण फरार आहेत. शब्बीर व त्याचा एक साथीदार हे 2012 मध्ये झालेल्या आझाद मैदान दंगलीतील आरोपीही  आहेत.
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून गुरुवारी दुपारी अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू होती. त्यावेळी मोहिमेला विरोध म्हणून शब्बीर व त्याच्या साथीदारांनी एका  झोपडीत रॉकेल टाकण्यासह सिलिंडरचा नॉब खुला केला. यात शेकडो झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. या सर्व प्रकारात शब्बीर व अन्य जण दोषी असल्याचे प्राथमिक  तपासात समोर येत आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त दीपक देवराज यांनी दिली. यामध्ये शब्बीरचा साथीदार व या घटनेतील मुख्य सलमान हा फरार आहे. शब्बीर विरोधात वि विध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचेही देवराज यांनी सांगितले.