जिगाव प्रकल्प गावठाण पुनर्वसनाच्या निकृष्ट कामाची त्वरीत चौकशी करा
बुलडाणा, दि. 31, ऑक्टोबर - जिगाव प्रकल्पाच्या गावठाण पुनर्वसनाच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सपकाळ यांनी मुख्यअभियंता पाटबंधारे विभाग अमरावती यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, जिगाव प्रकल्पांतर्गत प्रकल्पाच्या कडेला ग्राउंड (दगडी बांधकाम) चे काम सुरू असून त्यामध्ये नियमाप्रमाणे दगड, मजुरंकडून न भरता रात्रीच्या वेळेला पोकल्यांड मशीनच्या सहाय्याने भरण्यात येते. त्यामुळे दगडासोबत मातीसुद्धा मोठया प्रमाणात भरल्या जात असल्याने कामाचा दर्जा निकृष्ट होण्याची संभावना नाकारता येत नाही. तसेच कोला ग्राउंडच्या कामात रेती व गेरु दज्रेदार वापरण्यात येत नाही.
कोला ग्राऊंडच्या कामासाठी व धरण भिंतीच्या पिचिंगसाठी कोकल - वाडी येथील दगड खदान देण्यात आली आहे. परंतु तेथील दगड वापरण्यात येत नाही. तसेच टेल चॅनलच्या खोदकामात काही ठिकाणी रेतीचा भाग लागल्याने त्या ठिकाणी दक्षता घेऊन कोल ग्रांऊटचे काम करावयास पाहिजे. परंतु प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. झालेल्या कोल ग्राऊ ंडच्या कामावर पोकलॅड मशीन चालविल्याने दगडी टिना तुटून पडतात अशा पध्दतीने धरणाचे काम निष्काळजीपणे झाल्यास भविष्यात जिगावचे पाण शेत व टेमघर झाल्याशिवाय राहणार नाही.
गावठाण पूनर्वसनाची कामे निकृष्ट दर्जाजी होत आहे. तरी वरील कामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. अन्यथा न्यायालयीन मार्ग निवडावा लागेल. असे निवेदनात नमूद आहे. यावर प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.