ग्रीन बुलडाणा-क्लिन बुलडाणाचे स्वप्न भंगले!
बुलडाणा, दि. 31, ऑक्टोबर - थंड हवेचे ठिकाण म्हणून जिल्हा मुख्यालयाचा दर्जा इंग्रज काळात बुलडाण्याला मिळाला. अलिकडे वाढते तापमान ही ओळख मिरवत आहे. याला कु ठेतरी आपण सर्व जबाबदार नाहीत का? असा प्रश्न विचारुन नगरपालिका प्रशासनाने गेली अनेक वर्षे शहरातील स्वच्छता आणि वृक्षलागवड मोहिमेचा गाजावाजा केला. गुड मॉर्निंग पथक नेमून लाखो रुपये खर्च केले. शौचालयाचे अनुदानाचे वाटप केले.
स्वच्छता मोहीम आणि हगणदरीमुक्त शहर होण्यासाठी मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी तर गोरगरीब जनतेला वेठीस धरुन घराबाहेर शौचालयास जाणार्यांवर जुलमी अत्याचार करत ठिकठिकाणी लोकांना अडवून पोलिस स्टेशनमध्ये नेवून गुन्हे दाखल केले. तर मुख्याधिकार्यांनी अनेकांना उठबशा काढायला लावल्या हे सर्व गैरकृत्य उघड्या डोळ्यांनी सर्वांनी पाहिले आहे. असे असताना शहराच्या विकासासाठी, स्वच्छता मोहिमेसाठी, वृक्षसंवर्धनासाठी आम्ही किती कार्यरत आहोत हे दाखविण्यासाठी नगराध्यक्ष नजमुन्नीसा मो.सज्जाद, त्यांचे पती मो.सज्जाद, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण व टीमने अनेकवेळा केवळ प्रसिद्धीसाठी स्वच्छता मोहीम राबवून हातात झाडू घेवून स्वच्छता केली, तेही केवळ फोटो आणि फक्त फोटो शेशनसाठीच. याचे ताजे उदाहरण म्हणजे 1 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासकीय विश्रामगृहाजवळील चौकात स्व.वसंतराव नाईक असे नामकरण करण्यात आले.
यावेळी शहरातील प्रथम नागरिक नजमुन्नीसा मो.सज्जाद, आमदार हर्षवर्धन सपकाळ, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, नगरसेवक मो.सज्जाद, काँग्रेस नेते संजय राठोड, पर्यावरण मित्र ग्रुपचे चंद्रकांत काटकर व शहरातील अनेक नामवंत, प्रतिष्ठित हजर होते. या सर्वांच्या उपस्थितीत या दिवशी शासकीय विश्रामगृहाच्या समोरील रस्त्यावर आमदार हर्षवर्धन सपकाळ सह सर्व मातब्बर मंडळीच्या उपस्थितीत दुतर्फा वृक्षारोपन करण्यात आले. त्याचे फोटो काढून विविध वृत्तपत्रांना पाठविण्यात आले. या निमित्ताने मुख्याधिकार्यांसह अधिक ारी कर्मचारी, लोकप्रतिनिधींनी स्वत:ची प्रसिद्धी करुन घेतली. मात्र तीन महिन्यात आज येथेच काय शहरातील 90 टक्के झाडे पालिका प्रशासनाला जगवता आली नाहीत. हे वास्तव असून आम्ही शहरातील अनेक ठिकाणी फेरफटका मारला. आम्हाला शहरात कुठेही झाडे लावलेली दिसून आली नाहीत. मात्र, पालिका प्रशासनाने अनेक ठिकाणी ग्रीन सिटी-क्लिन सिटीचा संदेश देणारे फलकांवर हजारो रुपये खर्च केले, प्रसिद्धीसाठी फोटो शेशन झाले तरीही शहरात वृक्षसंवर्धन होवू शकले नाही, प्रशासनाकडून केवळ प्रसिद्धीसाठी काम करण्यात येत असल्याने जनतेमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
म्हणून सजग नागरिकांकडून प्रशासनाने जेवढी कामे केलीत त्याचाच प्रचार करावा व सर्वसामान्य जनतेला वेठीस न धरता “स्वच्छ शहर सुंदर शहर’’ ही संकल्पना राबवावी. नसता प्रसिद्धीची उठाठेव न करता प्रत्यक्ष काम करुन जनतेकडून चांगल्या कामाची पावती मिळवावी. अन्यथा लोकप्रतिनिधींना बोलावून त्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपनसारखे कार्यक्रम घ्यायचे आणि ते जगविण्यासाठी काहीच उपाययोजना न करता पुढे पाठ मागे सपाट असा कार्यक्रम राबविल्यास लोकप्रतिनिधींसह जनता माफ करणार नाही.