Breaking News

आमदार फुंडकर पिता-पुत्रांनी विकास केला काय?

बुलडाणा, दि. 31, ऑक्टोबर - सन 2014 मध्ये पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत खोटी आष्वासने देऊन व जनतेची दिशाभूल करुन भाजपाने राज्याची सत्ता हस्तगत के ली. राज्यात सत्ता परिवर्तनानंतर देखील भाजपा सरकारने केवळ घोषणांचाच पाऊस पाडला असून अंमलबजावणी न केल्यामुळे जनतेचा विष्वासघात केला आहे, भाजपाच्या सत्ता  स्थापनेला दि.31 ऑक्टोबर रोजी 3 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची जाणीव करुन देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने  30ऑक्टोंबर रोजी  माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हजारो काँग्रेस जणांसह हातात गाजर घेउन आमदार फुंडकर पिता-पुत्रांनी विकास  केला काय .. गाजर... अशा जोरदार घोषणा देउन निदर्शने करण्यात आली. 
यावेळी विषारी औषधाच्या फवारणीने 21 शेतकयांचा नाहक बळी गेल्यामुळे कृषीमंत्री फुंडकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत  माजी आमदार  दिलीपकुमार सानंदा यांनी  उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री यांना फवारणी पंपाची भेट देउन भाजपा सरकारचा निषेध केला.
गेल्या 3 वर्षात केंद्र व राज्यातील भाजपा सरकार सर्वच स्तरावर अपयषी ठरल्यामुळे राज्यात सर्वाधिक षेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. सोबतच वाढती महागाई, पेट्रोल  डिझेलचे गगनाला भिडलेले भाव, गॅस सिलेंडरचे वाढलेले भाव, नोटबंदी, जीएसटी कर प्रणालीमुळे लहान मोठ्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून बाजारपेठेत  उलाढाल ठप्प झाली आहे. शेेतकर्‍यांना समृद्ध करण्याचे भाष्य भाजपा सरकारने केले होते. भाजपा सरकारने केलेली कर्जमाफी ही शेेतकरी सन्मान योजना नव्हे तर शेतकर्‍यांचा  अपमान करणारी योजना आहे. कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिल्यावरही शेेतकरी बांधवांच्या खात्यात आजपावेतो पैसे जमा झालेले नाहीत. शेेतमालाला हमी भाव देण्याचे अभिवचन भाजपा  सरकारने दिले होते. मात्र मागील वर्षी शेेतकयांच्या फक्त तुरीची पूर्ण खरेदी सरकार करु षकले नाही. यावरुन शेतकर्‍यांना उध्वस्त करण्याचे षडयंत्र भाजपा सरकारने चालविले आहे.  हा निंदनीय प्रकार काँग्रेस कदापी यशस्वी होऊ देणार नाही. भाजपा सरकार दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करु शकत नसल्यामुळेच भारतीय जनता पक्षाचा निवडणूकीमधील  वचननामा सुध्दा संकेतस्थळावरुन काढण्याची नामुष्की भारतीय जनता पक्षावर आली.
राज्याचे कृषीमंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या स्वजिल्ह्यातच सततच्या नापीकी व कर्जबाजारीपणामुळे अंदाजे 170 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी एका वर्षात  आत्महत्या केल्या आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा करुन सुध्दा आत्महत्येचे सत्र अद्याप थांबलेले नाही यावरुन ही कर्जमाफी फसवी ठरली असुन खरीप पीक हंगामासाठी 10  हजार रुपयांची अग्रीम राशी आजवर शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आली नाही, ठिबक सिंचनाचे अनुदान लाभार्थी शेेतकरी बांधवांना प्रत्यक्षात मिळाले नाही. परिणामी  सरक ार विरुध्द प्रचंड जनआक्रोष निर्माण झाला आहे.
सन 2014 च्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगांव येथील जाहीर सभेत खामगांव जिल्हा व खामगांव जालना रेल्वे मार्ग करण्याचे  आश्‍वासन जिल्हा वासियांना दिले होते. या घोषणेला आज तीन वर्षाचा कालावधी झाला आहे परंतू अद्यापपावोत या आश्‍वासनांची पूर्तता झाली नाही. राज्य सरकारच्या वर्षपूर्ती नि मित्त 31 ऑक्टोबर 2015 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खामगांव शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 च्या चैपदीकरण व सौंदर्यीकरण कामाचा भूमिपूजन  सोहळा मोठा गाजा वाजा करुन घेतला होता. त्यावेळी आ.पांडुरंग फुंडकर यांनी आम्ही बोलून दाखवित नाही तर विकास कामे करुन दाखवितो.  खामगांव-चिखली जालना  राज्य मार्गाविषयी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात या रस्त्याचे काम मागील 3 वर्षापासून थंड बस्त्यात आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना  आपले प्राण गमवावे लागले आहेत. या रस्त्याचे काम सुध्दा त्वरीत सुरु करण्यात यावे. बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री फुंडकर व स्थानिक आमदार आकाश फुंडकर  यांच्या अधिपत्याखाली खामगांव नगर पालिकेत भाजपाची सत्ता आहे. मात्र काँग्रेसच्या कालावधीत मंजूर असलेली विकास कामे व पूर्णत्वास जाणारी ज्यात प्रामुख्याने राजर्षी शाहू  महाराज स्मारक, मातोश्री रमाई आंबेडकर बहुउद्देशीय सभागृह, तसेच पांडुरंग फुंडकराचा ड्रीम प्रोजेक्ट नाना-नानी पार्क इत्यादी विकास कामांचा समावेश आहे ही विकास कामे  मागील 1 वर्षापासून ठप्प पडलेली आहेत ही कामे त्वरीत सुरु करावी.