शिवसेनेच्या विधानसभानिहाय बैठकांना संजय राऊत यांच्या उपस्थितीत सुरुवात
पुणे, दि. 14, ऑक्टोबर - शिवसेना नेते आणि पुणे विभागिय संपर्कनेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या विधानसभानिहाय बैठकांना आज (शनिवारी) सुरुवात झाली आहे. या बैठकीत राऊत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत.चिंचवडस्टेशन येथील डबल ट्री हॉटेलमध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून या बैठकांना सुरुवात झाली आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे, महिला आघाडीच्या शहरसंघटक सुलभा उबाळे, राम गावडे उपस्थित आहेत.पिंपरी मतदारसंघ पदाधिका-यांच्या बैठकीनंतर चिंचवड मतदारसंघ पदाधिका-यांची दुपारी बारा वाजता तर, भोसरी मतदारसंघ पदाधिका-यांची दुपारी एक वाजता बैठक होणार आहे.